Watching the Changing TIME

                                                                                                                                    १९ मार्च २०२५ २३:३२
काळ बदलताना पाहणं . . . 

डोळ्यासमोर गोष्टी बदलत जाण तसं काही नवं नाही. 

बदल हाच स्थिर नियम आहे... 

फक्त जास्त अवधीसाठी इथं (अस्तित्वात) असण्यामुळं आहे कि नोंद ठेवणार मन जास्त संवेदनशील झालं आहे. 

फक्त स्वतःसाठी पाहिलेल्या नोंदवलेल्या (स्वगत) गोष्टी कदाचित  लिहून ठेवण्याची (प्रगट) मांडून ठेवण्याची वेळ आली आहे का?

पहिली नोंद कदाचित स्वतःच्या शेजारी असलेल्या देशाबद्दल तिच्यात होणाऱ्या बदलाबद्दल आहे. 

पाकिस्तानबद्दल असलेली उत्सुकता जाणून घेण्याची इच्छा 

तिच्यामुळं झालेली आयेशा जलाल, फरझान शेख, इयान टॉलबॉट, परवेझ हुडबॉय, आयेशा सिद्दिका, अरुणा टिकेकर, निळू दामले, श्रुती कपिला यांच्या लिखाणाशी झालेली ओळख बदलणाऱ्या काळात माणूस म्हणून जगण्यासाठी समृद्ध करणारी होती. 

एक देश (मनुष्य समुह) त्याच्या अस्तित्वात येण्याचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचे अर्थ शोधात राहण्याचा प्रवास . . . 

काळाच्या अघोत अस्तित्वाचे अर्थ शोधण्याचा एका व्यक्तिचा प्रवास गुंतागुंतीचा असू शकतो तर देशाचा (मनुष्य समूहाचा) तर कैक पटीनं एकमेकात गुंतलेला असतो. 

एकाच वेळी जन्मलेल्या  या जुळ्या देशांचे प्रवास एकमेकांसोबत समांतर चालतात असं वाटत कित्येकदा. 

आताशा एकसाची तयार होत जाणाऱ्या प्रतिमा पाहताना पूर्वी वाचलेलं, अनुभवलेलं, नोंद करून ठेवलेले वाटून घ्यायला हवं तरच या एकसाची बनत जाणाऱ्या समाजाला स्वतःचे खरे अंतरंग पाहण्याचं भान परत मिळवता येईल कदाचित... 
 




 



Comments